breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवधर्म पद्धतीने आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न

कळंब । महाईन्यूज ।  प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदूळवाडी तालुक्यात राहणाऱ्या काळे-डिकले कुटुंबियांनी आपल्या मुलांचा विवाह शिवधर्म पद्धतीने करुन आदर्श निर्माण केला आहे. कोरोणा विषाणुच्या पार्श्वभूमीवर नववधु-वरांच्या पालकांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतूक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सोमवार दिनांक 18/05/2020  रोजी सकाळी ठिक 9 वाजता मौजे तांदुळवाडी ता कळंब जि उस्मानाबाद येथे काळे डिकले परीवारांचा शिवविवाह सोहळा शिवधर्म पद्धतीने अतिशय आनंदीवातावरणात संपन्न झाला सध्या जगभर कोरोणा सदृश्य परीस्थितीमध्ये सतीश काळे, जिल्हाउपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पुणे यांनी आपल्या मुलाचा शिवविवाह अगदी साध्या पद्धतीने करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे

या शिवविवाह सोहळ्याची सुरूवात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक  तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम बापू कुंजीर यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली

 सध्या जगभरामध्ये कोरोणा विषाणूने थैमान घातला आहे त्यामुळे विवाह  सोहळा अगदी साध्या पद्धतीने करून  देशाला काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने काळे परीवाराच्या वतीने खर्चात बचत करून मुख्यमंत्री सहायता निधीला 11 हजार रुपये रकमेचा धनादेश शासन प्रतिनिधी तलाठी प्रविण भातलंवडे ग्रामसेविका यु एन झगडे यांच्याकडे *वधुवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला

यावेळी शिवविवाह सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित योग्य सामाजिक  अंतर ठेवून शानिटायझर मास्कचा वापर  करून पार पाडण्यात आला तसेच ह्या शिवविवाहाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब राष्ट्रसंत जगतगुरु तुकोबाराय व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेने शिवविवाहाची सुरूवात करण्यात आली त्यानंतर योगेश्वर अंबाड यांनी शिवपंचके म्हणून विवाह पार पाडला. वधुवरांच्या अंगावर अक्षता म्हणून धान्याची उधळन न करता फुलांचा वर्षाव करण्यात आला लग्नानंतरही सोहळावा सत्यनारायण या सारखे विधी केले जाणार नाहीत.

या शिवविवाह सोहळ्यास संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अतुल गायकवाड शिवसेना कळंब तालूका प्रमुख शिवाजी (आप्पा) कापसे तुकाराम काकडे पोलिस पाटील विलास काळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button