शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटनात्मक मोर्चेबांधणी, युवती सेलच्या निवडी जाहीर
शिराळा | प्रतिनिधी
चिखली (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका व जिल्हास्तरीय युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडी जाहीर केल्या. निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, खा. सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्ष, मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी महिलांना समाजकारण व राजकारणात पुढे आणण्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे.
राष्ट्रवादी सर्वांना समान न्याय देणार पुरोगामी विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे नूतन पदाधिकार्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी, प्रश्नांना न्याय देण्यासाठी काम करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलावडे, युवा नेते विराज नाईक, युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पूजा लाड, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिराळा तालुकाध्यक्ष रुपाली भोसले, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल पवार, युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाळवा तालुकाध्यक्ष प्रज्ञा पाटील, देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील, प्रा. पी. आर. माळी आदी उपस्थित होते. नूतन निवड झालेले पदाधिकारी असे : जिल्हा उपाध्यक्ष : हर्षल गायकवाड (फुफेरे), जिल्हा सदस्य : श्रद्धा पाटील (बिऊर), तालुकाध्यक्ष पौर्णिमा पवार (सागाव), उपाध्यक्ष प्राजक्ता पाटील (बिऊर) व सायली पाटील (तडवळे), सचिव : स्नेहल पाटील (कणदूर).