शाहरुखवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरही म्हणाले #HappyBirthdaySRK
‘किंग खान’, ‘बादशाह’, ‘बाजीगर’, ‘राज’, ‘राहुल’ अशा अनेक नावांनी जगभरातील चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणारा आणि मागील तीन दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान याचा आज ५३ वाढदिवस. सालाबादप्रमाणे यंदाही शाहरुखची एक झकल मिळवण्यासाठी चाहत्यांनी काल रात्रीपासूनच त्याच्या मुंबईतील मन्नत या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. मागील वर्षी बराच तास चाहत्यांना ताटकाळत ठेवणाऱ्या शाहरुखने वाढदिवसचा रात्री १२चा ठोका पडल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या चाहत्यांना दर्शन दिले. शाहरुखच्या चाहत्यांनी या क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चांगलेच व्हायरल केले आहेत. मात्र शाहरुखवरील प्रेम केवळ ऑफलाइनच न राहता आज सकाळपासूनच ट्विटवर शाहरुखच्या वाढदिवसाचीच चर्चा आहे.
मध्यरात्री पासूनच ट्विटवर #HappyBirthdayShahRukhKhan, #HappyBirthdaySRK आणि #KINGKHAN हे हॅशटॅग भारतामध्ये टॉप ट्रेण्डींग होते. हे हॅशटॅग वापरून अनेकांनी शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काहींनी केकचे फोटो पोस्ट केले तर काहींनी शाहरुखच्या फोटोंचे कोलाज पोस्ट केले. आपल्या आवडत्या कलाकारावरील प्रेम दाखवताना नेटकऱ्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. बरं या शाहरुखवेड्यांमध्ये काही बड्या नावांचाही समावेश आहे हे विशेष. म्हणजे अगदी क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरपासून ते अभिनेता स्वप्नील जोशीपर्यंत अनेकांनी ट्विटवरून शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहुयात कोणी काय ट्विट केलं आहे शाहरुखला ‘हॅपी बर्थ डे’ म्हणताना…
सचिन तेंडुलकर
आमिर खान
हरभजन सिंग
विरेंद्र सेहवाग
पल्लवी सुभाष
स्वप्नील जोशी
अदिती सिंग शर्मा (गायिका)
अमृता खानविलकर
दिपा मल्लिक (दिव्यांग खेळाडू)