पुणे

शाळकरी मुलांनी बनवलेला रोबो ठेवणार पुण्यातील वाहतुकीवर नजर

पुण्यात वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी वाहतूक पोलिसांना आता रोबोटची मदत मिळणार आहे. रोबोटच्या चाचणीला आजपासून सुरुवात करण्यात आली असून यामुळे पुण्यातील वाहन चालकांवर सीसीटीव्ही नंतर रोबोटची नजर असणार आहे.

रोबोट चाचणीचे उदघाटन पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते या देखील उपस्थित होत्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणाले की, पुणे शहरातील काही रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर रोबोटच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण करण्यास मदत होणार आहे.

त्याचा प्रतिसाद पाहून इतर रस्त्यांवर देखील रोबोटची व्यवस्था केली जाणार आहे. अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे पुणे हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे.

वाहतुकीचे नियम पाळण्यास रोबोट अधिक फायदेशीर ठरेल

पुणे पोलिसांकडून वाहतुकीचे नियम पाळण्याच्या दृष्टीने रोबोट तयार करण्यात आला आहे. हा रोबोट आठवी ते दहावी मधील सहा मुलांनी तयार केला आहे. त्यातील पार्थ कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला की, वाघोली येथील श्री चैतन्य techno school मध्ये आठवीमध्ये आहे. तसेच SP robotics मध्ये शिक्षण घेत असून मागच्या महिन्यात रोबोट तयार करण्याबाबत विचारणा झाली होती. तेव्हा सहा जणांच्या टीमने हा रोबोट तयार केला असून यामुळे शहरातील वाहतूक नियमाचे पालन अधिकाधिक नागरिक करतील आणि पोलिसांसाठी हा रोबोट फायदेशीर ठरेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button