breaking-newsपिंपरी / चिंचवड

शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शूल्क सरसकट माफ करा, भाजप नगरसेवकाची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यातील विद्यार्थ्यांची शालेय फी सरसकट माफ करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.

यासंदर्भात केंदळे यांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवेदन वाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात लाॅकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊननंतर अटी शिथिल केल्या गेल्या. मागील काही दिवसापासून नागरिकांचे दैनंदिन जीवन थोड्याफार प्रमाणात सुरू झाले आहे. परंतू, नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच मुलांचे शालेय शुल्क भरणे जास्तच कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सरसकट शालेय फी माफ करावी.

सद्यपरिस्थितीत राज्यात खाजगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शूल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना त्रस्त सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने मे महिन्यात राज्यातील शाळांना शुल्क वाढ आणि जमा करण्याची सक्ती करू नये, असा निर्णय व परिपत्रक सर्व संस्थाना दिले आहे. राज्यातील काही संस्था, शाळा यांच्या अनेक तक्रारी येत असताना शासनाचा निर्णय डावलताना दिसत आहेत.

शासन निर्णयाचे पालन न करता, पालकांना खाजगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी भरण्यासाठी अतिरेक चालू आहे. यामुळे शासनाच्या आदेशाचे पालन न  करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केंदळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button