breaking-newsपिंपरी / चिंचवड

शालेय पोषण आहार योजनेत ठेकेदारांचा मनमानीपणा – प्रतिक्षा घुले.

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शालेय पोषण आहार योजनेनुसार विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, तसेच शासकीय शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, म्हणून शासनाने ही योजना अंमलात आणली. परंतु, बोपखेलमधील पिंपरी-चिंचवड मनपाच्या शाळेत मनमानी कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठेकेदार स्वताच्या मनमानीनुसार वागत आहेत. बोपखेल येथील शाळेत विद्यार्थी व पालक यांच्याशी युवासेनेच्या पदाधिका-र्यांनी चर्चा केली असतां ते म्हणाले की, निकृष्ट दर्जाचा फक्त वरण-भात आणि हळद टाकुन रंगवलेला पिवळा भात विद्यार्थ्यांना देण्यात येतो. त्या भातामध्ये खडे असतात, वरणामध्ये डाळीचा पत्ता नसतो. शासनाच्या परिपत्रकानुसार मुलांना ३ दिवस वरण-भात, १ दिवस मसुर डाळ, २ दिवस मटकी-वाटाणा उसळ भात असा आहार देणे अनिवार्य आहे. परंतु, ठेकेदार सगळे नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत मुलांच्या आरोग्याशी खेळत आहेत,असा आरोप युवासेनेच्या युवती अधिकारी प्रतिक्षा घुले यांनी केला आहे.

ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा पिंपरी शिवसेना-युवासेनातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षण प्रशासन अधिकारी जोत्सना शिंदे व सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांच्याकडे देण्यात आली. यावेळी पिंपरी युवासेनेच्या युवती अधिकारी प्रतिक्षा घुले, युवा विभाग संघटक सनी कड, दक्षता समिती सदस्य रवि कोवे, महेंद्र वर्मा आदि उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button