breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…

मुंबई | महाईन्यूज

शालेय अभ्यासक्रमात शरद कमळ बघ, छगन कमळ बघ या वाक्याचा समावेश करण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन फडणीवस सरकारला टोला लगावला आहे. ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’ असा धडा बदलणाऱ्यांना मला सांगायचं आहे की, माझ्यावर लहानपणापासून कमळ बघण्याचे संस्कार झालेले नाहीत. माझा जन्म झाला त्यावेळी सात दिवसांचा असताना आईच्या काखोटीतून स्कूल बोर्डाच्या मीटिंगला गेलो आहे. त्यामुळे मला कमळ कसं दिसेल?,” असं शरद पवारांनी यावेळी म्हटलेलं आहे.

शिक्षक परिषदेचा मुंबई विभाग आणि शिक्षक भारती या संघटनांची अधिवेशने शनिवारी पार पडली. राजकीय टोलेबाजी आणि शिक्षण विभागाच्या धोरणांवरील टीकेने ही अधिवेशने गाजली. शिक्षक भारतीच्या अधिवेशनात पवार आणि खासदार संजय राऊत यांनी पूर्वीच्या शासनाने घेतलेल्या निर्णयांचा समाचार घेतला, तर परिषदेच्या अधिवेशनात माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महापालिकेच्या शाळा सीबीएसई, आयसीएसई मंडळाशी संलग्न करण्याच्या निर्णयावर टीका केलेली आहे.

“शाळा बंद करण्याचा निर्णय हा असंवेदनशील होता. शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देतानाच विचार केला पाहिजे. त्या सुरू केल्यानंतर त्यांना अनुदान न देणे, शाळा बंद करणे हे योग्य नाही. शिक्षकांचे प्रश्न खूप आहेत, ते सगळे लगेच सोडवता येतील असे नाही. मात्र काही महत्त्वाचे मुद्दे लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्याबाबत शिक्षणमंत्री, अर्थमंत्री यांच्याशीही चर्चा करण्यात येईल,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button