Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शहीद हेमू कलानीं’च्या पुतळ्याचे ‘अाधी भूमिपुजन’; नंतर विषय स्थायीसमोर ठेवला ‘मंजुरी’ला

– सत्ताधारी भाजप पदाधिका-यांना विकास कामांच्या भूमिपुजनाची एवढी घाई का? 

पिंपरी – पिंपरीतील उद्यानात शहीद हेमू कलानी यांच्या पुतळ्याचे भूमिपुजन पालकमंत्री गिरीष बापट यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. मात्र, पालकमंत्र्याना महापालिकेतील भाजप पदाधिका-यांनी अंधारात ठेवल्याचे दिसत आहे. मुळात शहीद हेमु कलानीच्या पुतळ्याचा विषय अद्याप मंजुर झालेला नाही. हा प्रस्ताव बुधवारी (दि.30) रोजी होणा-या स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यामुळे मंजूर नसलेल्या त्या पुतळ्याचे भाजप पदाधिका-यांनी एवढ्या घाईगबडीत भूमिपुजन का? केले, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापाैर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, नगरसेवक संदीप वाघेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. भूमिपुजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळी व पदाधिका-यांना हे सर्व माहिती असूनही त्यांनी  दिमाखात भूमिपुजनाचा कार्यक्रम आटोपला.

त्यामुळे पिंपरीतील जनतेला सत्ताधारी भाजपने वेढ्यात काढण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही किती तत्परतेने विकास कामांचे भूमिपुजन करतोय, असे भासविण्याचा प्रयत्नही केला आहे. परंतू, केवळ कामांचे प्रदर्शन व मार्केटिंग करण्याची भाजपला जास्तच घाई झाल्याचे दिसत आहे. इतक्या घाईगबडीत एखादा विषय मंजूर नसताना विकास कामांचे भूमिपुजन करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांतुन विचारला जात आहे. आधी भूमिपुजन करायचे आणि त्यानंतर हा विषय मंजूर करण्यासाठी स्थायी समितीसमोर ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

महापालिकेच्या उद्यानात शहीद हेमू कलानींचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मे. हर्ष एंटरप्रायझेस या ठेकेदारांची निविदा रकमेच्या 24 लाख 89 हजार 600 रुपयापेक्षा 4 टक्के दराने निविदा आलेली आहे. कामांची मुदत नऊ महिने असून निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने ठेकेदाराला मुदतीत काम करण्याची अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता दिली आहे. हा विषय येत्या (बुधवारी दि.30) मान्यतेसाठी ठेवला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button