breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शहरात प्लास्टीक, थर्माकोलचे वेस्ट संकलन सुरु

पिंपरी-  महापालिका व पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने प्लास्टीक व थर्माकॉल वेस्ट संकलन मोहिमेत सुमारे ७८ किलो प्लास्टिक आणि ६ किलो थर्माकोल संकलित करण्यात आले.
यावेळी निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालय, भाजी मंडई, डी मार्ट चिंचवड, सेंट्रल मॉल पिंपरी, बिग बझार चिंचवड, स्टार बाजार मॉल, आकुर्डी येथे ब क्षेत्रीय कार्यालय चिंचवड, शिवाजी चौक वाल्हेकरवाडी, गांठीपेठ चिंचवडगाव, डीमार्ट, रावेत येथे फ क्षेत्रीय कार्यालय, टिळक चौक निगडी, कस्तुरी मार्केट कृष्णानगर, चिखली चौक, रुपीनगर पोलिस चौकी जवळ, मनपा व्यायामशाळा, तळवडे चौक येथे प्लास्टीक व थर्माकोल संकलित केले जाणार आहे.
२१ एप्रिल रोजी ड क्षेत्रीय कार्यालय रहाटणी, मोर रिटेल शॉपींग सेंटर पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड येथील आरोग्य निरीक्षक कार्यालय, ग क्षेत्रीय कार्यालय थेरगांव, १६ नंबर बस स्टॉप, डांगे चौक थेरगाव, डी मार्ट काळेवाडी, ह क्षेत्रीय कार्यालय कासारवाडी, आचार्य अत्रे रंग मंदिर संत तुकाराम नगर, मेगामार्ट फुगेवाडी, सांगवी कर संकलन कार्यालय, शहिद भगतसिंग मनपा शाळा दापोडी, आरोग्य निरीक्षक कार्यालय,साई चौक येथील संकलन केंद्रांवर प्लास्टीक व थर्माकोल संकलित केले जाणार आहे.
क क्षेत्रीय कार्यालय, कृषी बाजार समिती मोशी, रसरंग चौक मासुळकर कॉलनी, तिरुपती बालाजी चौक इंद्रायणीनगर, डायग्रॉल मॉल, जाधववाडी राजे शिवाजीनगर या सकंलन केंद्रामधुन अंदाजे २४ किलो प्लास्टीक व १ किलो थर्माकोल संकलित करण्यात आले. आरोग्य निरिक्षक विजय दवाळे, वैभव कैंचरगौडार, सचिन जाधव, आरोग्य मुकादम दगडू लांडगे, नवनाथ काळे यांनी या संकलन केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणुन काम पाहिले.
इ क्षेत्रीय कार्यालय, संत निरंकारी सत्संग भवन, लांडेवाडी अग्नीशामक केंद्र, बोपखेल मनपा दवाखाना, च-होली आरोग्य कार्यालय, मोशी करसंकलन कार्यालय या सकंलन केंद्रामधुन अंदाजे ५४ किलो प्लास्टीक व ५ किलो थर्माकोल संकलित करण्यात आले. मुख्य आरोग्य निरीक्षक ए.व्ही. गुमास्ते आरोग्य निरिक्षक रोहन डामसे, सुधीर वाघमारे, सुधीर वाघमारे, राजू साबळे या संकलन केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणुन काम पाहिले.
शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी यानंतर कोणत्याही व्यावसायिक, व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये प्लास्टिक आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असून, कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. पहिला गुन्हा रु. ५०००/- दंड, दुसरा गुन्हा र.रु १००००/- दंड व तिसरा गुन्हा यांस र.रु २५०००/- दंड व तीन महिने इतक्या मुदतीची कारावास असा दंड आहे.
कोणतीही व्यक्ती, संघटना, संस्था, शाळा,क्रिडा संकुल, क्लब्स, चित्रपट व नाटयगृहे, औदयोगिक संस्था, हॉल, कार्यालये, धार्मिक संस्था, हॉटेल, दुकानदार, मॉल्स, विक्रेता, केटरर्स, व्यापारी, फेरीवाला, वितरक,वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादक, यांनी बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टीक व थर्माकॉल वस्तु, पेट बाटल्या क्षेत्रीय कार्यालय व निश्चित केलेले संकलन केंद्रात जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button