breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शहरात पीएमपीएलएलचे होणार विभागीय कार्यालय

पिंपरी- शहरात पीएमपीएमएलचे कार्यालय नसल्याने अनेक नागरिकांच्या तक्रारीं करता येत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, त्यांना पुण्यात जाण्यांचा हेलपाटे कमी व्हावेत, याकरिता पीएमपीएमएलचे विभागीय कार्यालय करुन त्या ठिकाणी सक्षम अधिका-यांची नियुक्ती करण्यात यावी, असा ठराव महापालिकेच्या स्थायी समितीने आज (बुधवारी) सभेत केला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय निश्चित दुर होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सदस्य विलास मडेगिरी यांनी दिली. 

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरमहा अग्रीम स्वरुपात संचलन तुट व सवलतीच्या पासपोटी 7 कोटी 50 रुपये अदा करण्यात येणार आहेत. यावेळी पीेएमपीबाबत स्थायीच्या सभेत चर्चा करण्यात आली.  नियोजित वेळेत बस न सुटणे, बसच्या खेपा रद्द होणे अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. परंतु, त्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी आणि बस संचालनयाचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पूर्वीप्रमाणे पीएमपीएमएलचे महामंडळ मुख्यालय क्रमांक दोनचे कार्यालय पिंपरीत सुरु करावे.  पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात कार्यालय सुरु करण्यात यावे. त्याच्या नियंत्रणासाठी सक्षम अधिका-याची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे पीएमपीएमएल प्रशासन आणि महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात समन्वय साधण्यासाठी या कार्यालयात पीएमपीएमएलचे कर्मचारी संजय कुटे यांची नेमणूक करण्यात यावी, असे याबाबतच्या ठरावात म्हटले आहे. तसेच शहरात पीएमपीएमएलच्या किती बस धावतात. किती खराब झाल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी पुढील आठवड्यात चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात एक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत पीएमपीएमएलच्या अध्यक्षांकडून सर्व माहिती घेतली जाणार असल्याचे, स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button