breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

शरीफ यांच्या ठेवी भारतात ठेवल्याचे जागतिक बॅंकेने नाकारले

वॉशिंग्टन – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी 4.9 अब्ज डॉलर भारतामध्ये जमा केल्याचे प्रसार माध्यमांमधील वृत्त जागतिक बॅंकेने फेटाळले आहे. पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी नवाझ शरीफ यांच्याबाबतचे हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पाकिस्तानमधील “नॅशनल अकाउंटॅबिलीटी ब्युरो’ने नवाझ शरीफ आणि इतर सर्व संबंधितांविरुद्धच्या आरोपांच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

जागतिक बॅंकेच्या “रेमिटन्स ऍन्ड मायग्रेशन रिपोर्ट 2016′ चा हवाला देऊन प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यां चूकीच्या आहेत, असे जागतिक बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. जागतिक बॅंकेच्या अहवालामध्ये कोणत्याही प्रकारच्या “मनी लॉंडरिंग’ अथवा अशा प्रकरणात कोणाही सहभागी व्यक्‍तींच्या नावांचा उल्लेख नाही, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.

या अहवालामध्ये द्विपक्षीय निधी आदान प्रदानाच्या तपशीलाची नोंद करण्यात आली आहे, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. पाकिस्तानातून 21 सप्टेंबर 2016 रोजी भारतात 4.9 अब्ज डॉलर जमा झाल्याचे वृत्त स्टेट बॅंक ऑफ पाकिस्ताननेही फेटाळले आहे. याचाही दाखला जागतिक बॅंकेने दिलेला आहे. तसेच अहवालातील परिभाषेचे योग्य स्पष्टिकरणही जागतिक बॅंकेने दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button