breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

शरद-प्रतिभा पुरस्काराचे मंगळवारी वितरण

पिंपरी / महाईन्यूज

शरद-प्रतिभा या पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड झाली. हा पुरस्कार येत्या मंगळवारी (दि. 29) कोल्हापूर येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती मी कास्ट फ्री मूव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गेडाम यांनी दिली. स्मृतिचिन्ह व मानपत्र रोख रक्कम रुपये पन्नास हजार आणि सत्यशोधक पोषाख, शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयतच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते असणार आहेत. यावेळी रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य एम. बी. शेख, राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राज्य समन्वयक संतोष साखरे, समाजिक कार्यकर्ते विजय मांडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रशांत गेडाम आणि सर्जेराव वाघमारे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button