breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पवार यांचे दर्शन थेट पंजाबमध्ये वाघा बाॅर्डरवर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अक्षरशः रान उठवलं. वयाच्या ७९व्या वर्षी पवार यांनी राज्यात ७८ जाहीर सभा घेतल्या. शेवटच्या टप्प्यातील मुंबईत मतदानाचा हक्क बजावून शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर निघून गेले. त्यानंतर पवार यांचे दर्शन थेट पंजाबमध्ये वाघा बॉर्डरवर झाले आहे.

पंजाबमध्ये कृषी अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या पवार यांनी वाघा बॉर्डरला भेट दिली. अभ्यास दौऱ्यासाठी आलेले सहकारी वाघा बॉर्डरला भेट देणार असल्याचे समजल्यानंतर त्यांनीही सहकाऱ्यांसोबत जाण्याची तयारी दर्शवली. सोशल मीडियावर स्वतः फारसे अॅक्टिव्ह नसलेल्या पवार यांची पोस्ट मात्र, त्यांचा नातू रोहित पवार यांनी केली आहे. त्याता रोहित यांनी शरद पवार यांच्या जुन्या राजकीय आठवणींना उजाळाही दिला आहे.

कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग पंजाबमध्येही होतात. त्या प्रयोगांची पाहणी करण्यासाठी शरद पवार, त्यांचे नातू रोहित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख पंजाब दौऱ्यावर गेले होते. दिवसभर दौऱ्यातील पाहणी झाल्यानंतर इतरांनी वाघा बॉर्डर येथील परेड पहायला जाण्याची तयारी केली.

शरद पवार यांना या नियोजनाची माहितीच नव्हती. पण, जेव्हा सगळे परेड पहायला निघाले आहेत. हे कळाल्यानंतर त्यांनीदेखील त्याच उत्साहाने येण्याची तयारी केली. वाघा-अटारी बॉर्डरवरची ती परेड पाहण्याचा योग या निमित्ताने आल्याची पोस्ट रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर केली आहे. त्यात त्यांनी पवार यांच्यासोबतचे काही फोटोही शेअर केले असून, पंजाबचे राजकारण आणि शरद पवार यांचा संदर्भही व्यक्त केला आहे. यावेळी पवार यांनी सहकाऱ्यांसोबत जुन्या आठवणींना उजाळाही दिल्याचे रोहित यांनी सांगितले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button