breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शरद पवार पहिल्यांदा निवडून आले, तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील- अजित पवार

खोपोली – ‘पवारांना बदलती हवा कळते, पवारांची माघार हा भाजपचा पहिला विजय’ असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार ज्यावेळेस पहिले निवडून आले, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रायमरी स्कुलमध्ये असतील, असा टोला माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.

ते खोपोलीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, ‘शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत. 1984 मध्ये शरद पवार हे नंबर 2 च्या मताधिक्याने निवडून आले होते. 1967 पासून 14 निवडणुकीत पवार साहेबांनी कधी अपयश पाहिलेलं नाही. त्यावेळेस भाजपच्या फक्त 2 जागा आल्या होत्या.’ असंही पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या त्या टिकेने अजित पवारांना संताप

शरद पवार यांची निवडणुकीतून माघार म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पहिला विजय असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते की, शरद पवारांना बदललेल्या हवेचा लवकर अंदाज येतो, त्यानुसारच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

शरद पवारांनी दिले होते संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की, मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही. त्याआधी त्यांनी बारामती हॉस्टेलला माढा मतदार संघातल्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवारांनी आपण उभे राहणार नसल्याचे संकेत दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button