breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कोणत्या विषयावर होणार चर्चा?

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सायंकाळी भेट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही भेट होणार आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये नियमित बैठक होते. गेल्या वेळी विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी दोघांमध्ये बैठक झाली होती.

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी सादर केली होती. मात्र, राज्यपालांकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या विषयावरदेखील मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, दिवाळीनंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्याने आणखी कशाप्रकारे पुढे नेता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button