breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शरद पवारांच्या उपस्थितीत आज एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश

मुंबई – गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपाचे बंडखोर नेते एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. राज्याच्या राजकारणातील ही मोठी घडामोड आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्यासोबत एकही आमदार, खासदार राष्ट्रवादीत येणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी गुरुवारीच विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत च्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यादेखील आहेत. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले असून राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे.

एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ‘मी भाजपाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपाचं काम केलं. भाजपा जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली’, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button