breaking-newsराष्ट्रिय

शबरीमला मंदिर दोन महिन्यांसाठी खुले

अत्यंत कडेकोट बंदोबस्तात शनिवारी सायंकाळी शबरीमलातील भगवान अय्यप्पा मंदिराचे दरवाजे मंडल-मकरविल्लाकू यात्रेकरिता दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले. सायंकाळी पाच वाजता कंदारारू महेश मोहनारारू यांनी मंदिरातील गाभारा उघडला आणि पूजा केली. या वेळी केरळ, तमिळनाडू आणि शेजारच्या अन्य राज्यांमधील भाविक मोठय़ा संख्येने हजर होते.दुपारी दोन वाजता मंदिराच्या दिशेने जाण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर भाविकांनी हातात इरुमुदिकेत्तू (पूजाअर्चा करण्याचे साहित्य) घेऊन मंदिराच्या १८ पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी पुरोहितांना मंदिरात पाद्यपूजा केली. त्यानंतर ए. के. सुधीर नंबुद्री (शबरीमला) आणि एम. एस. प्रामेश्वरन नंबुद्री (मलिकापूरम) या नव्या पुरोहितांनी सूत्रे हाती घेतली.

सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय एलडीएफ सरकारने घेतला त्यानंतर राज्यात आणि मंदिराभोवती उजव्या संघटना आणि भाजपने उग्र निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिली नाही. हे प्रकरण व्यापक पीठाकडे वर्ग केले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार खबरदारी घेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button