breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

शक्ती मलिकच्या हत्येप्रकरणी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर गुन्हा दाखल

बिहारमध्ये सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच तिथल्या राजकीय वर्तुळात मोठी घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दला म्हणजेच राजद पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे.

राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्ये प्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजदचे नेते तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधू यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मलिक यांच्या कुटुंबाकडून नोंदवल्या गेलेल्या तक्रारावरून या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता कोणते नवीन वळण घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button