breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“व्हॉट्सअप डीपी” ठेवलेला मुलीचा फोटो काढल्याने तरुणाला बेदम मारहाण, दोघांना अटक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – व्हॉट्सअप डीपीवर ठेवलेला मुलीचा फोटो काढला म्हणून पाच तरुणांनी मिळून एकाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली. तर, तीनजणांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 17) दुपारी दीडच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी बु. येथे घडला.

अंकुश संतु गारगोटे (वय 47) आणि अजय अंकुश गारगोटे (वय 21, दोघे रा. वाकी बु, ता, खेड, जि. पुणे) यांना अटक केली आहे. तर, संदेश मारुती टोपे, संतोष मच्छिंद्र टोपे, निखील बाळासाहेब गारगोटे (सर्व रा. वाकी बु, ता, खेड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दत्तात्रय नारायण जरे (वय 35, रा. वाकी बु. ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जरे हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले. व्हॉट्सअप डीपीवर ठेवलेला विद्याचा फोटो तु का काढला म्हणून वरील पाचजणांनी त्यांना शिवीगाळ केली. संदेश टोपे याने सचिन यांना गजाने मारहाण केली. इतर आरोपींनी काठीने पायावर मारहाण केली. या मारहाणीत सचिन गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button