breaking-newsआंतरराष्टीय

व्हिडीओ गेममधील वादातून गोळीबार; 2 ठार, 11 जखमी

मियामी – व्हिडीओ गेमच्या स्पर्धेदरम्यान स्पर्धकाने केलेल्या गोळीबारामध्ये 2 जण ठार झाले आणि अन्य 11 जण जखमी झाले. हा गोळीबार करणाऱ्या व्यक्‍तीने नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली. फ्लोरिडा राज्याच्या उत्तरेकडील जॅक्‍सनव्हिला शहरामध्ये ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

गोळीबार करणारा डेव्हिड कात्झ हा 24 वर्षीय युवक होता आणि तो मेरीलॅन्ड, बाल्टीमोरमधील रहिवासी होता असे महापौर माईक विल्यम्स यांनी सांगितले. घटनास्थळी तिघेजण मरण पावले. त्यापैकी एकजण गोळीबारातील संशयित होता, असे त्यांनी सांगितले. एकूण 11 जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

एका शॉपिंग कॉम्प्लेक्‍समध्ये आयोजित “मॅडन’या फुटबॉल ई स्पोर्टस स्पर्धेमध्ये कात्झ याने भाग घेतला होता. नॅशनल फुटबॉल लीगच्या धर्तीवर “मॅडन’ ही व्हिडीओ गेम खेळली जाते. त्यात पराभव झाल्याने कात्झला जबर धक्का बसला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button