breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्हिडीओ

व्हायरल Video : चमत्कारच! ट्रकखाली सापडूनही आजीबाई वाचल्या

दक्षिण भारतातील एका शहरात एक मोठी दुर्घटना होता होता राहिली. आजींच्या अंगावरून ट्रक गेल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. चमत्कार म्हणजे इतक्या मोठ्या दुर्घटनेत सापडूनही या आजी सुखरूप वाचल्या आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना तामिळनाडूतील तिरूचेंगोडे येथील आहे.

हा व्हिडीओ CGTN कडून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून १४१ पेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओ मिळाले आहेत. या आजी रस्त्यावर चालत असताना अचानक पिवळ्या रंगाचा ट्रक येतो आणि या आजींना खेचून नेतो. ट्रक निघून जातो, मग काहीवेळानंतर स्वतःहून या आजी उठून उभ्या राहतात. आजूबाजूला उपस्थित असलेले लोक या आजींच्या मदतीला धावून जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button