पिंपरी / चिंचवड

व्यवहारात पारदर्शकता वाढण्यासाठी ‘जीएसटी’ उपयुक्त: महापौर काळजे

पिंपरी: वस्तू व सेवा कर (जीएसटी) चा फायदा सर्व नागरीकांना होणार आहे. व्यवहारात पारदर्शकता वाढवण्यासाठी ही कर प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे, मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
  पिंपरी-चिंचवड महापालिका व चार्टर्ड इंजिनिअर अॅन्ड प्रॅक्टिसींग कॉस्ट अकाउन्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी विषयक जनजागृतीपर कार्यशाळेचे उद्‌घाटन अॅटो क्लस्टर येथे त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, हर्षल ढोरे, उत्तम केंदळे, केशव घोळवे, लक्ष्मण उंडे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, उषा मुंढे, चंदा लोखंडे, आरती चोंधे, कमल घोलप, अश्विनी बोबडे, सुनिता तापकिर, निर्मला गायकवाड, योगिता नागरगोजे, प्रियांका बारसे, सह आयुक्त दिलीप गावडे, दि इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकौन्टन्टस ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष देशमुख, आयसीएआयचे उपाध्यक्ष महिंद्र भोंबे, व्याख्याते ब्रिजमोहन शर्मा, लक्ष्मण पवार तसेच वरिष्ठ अधिकारी विकास आदवडे आदी उपस्थित होते.
  केंद्र सरकारने हा कायदा केल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याने केंद्र सरकारचे अभिनंदन करायला हवे असेही, महापौर काळजे म्हणाले.
  सहआयुक्त दिलीप गावडे यांनी आयोजित जीएसटीविषयक कार्यशाळेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आशिष देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी कुलकर्णी यांनी केले. तर, किशोर केदारी यांनी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button