breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

व्यवसाय म्हणून राजकारण करणा-यांना जनता माफ करणार नाही – गिरीश बापट

महायुती मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कचेरीचे उदघाटन

पिंपरी: काँग्रेस पक्षाने मागील पन्नास वर्षांपासून देशाला फसवलं आहे. त्यामुळे त्यांना मत मागायचा अधिकार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे पैसा ही शक्ती तर महायुतीकडे प्रेम हे अस्त्र आहे. ज्यांचा राजकारण हा व्यवसाय आहे, त्यांना जनता माफ करणार नाही. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार निवडून येणार आहे, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीचे बुधवारी (दि. 10) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उदघाटन झाले.

मध्यवर्ती कचेरीच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री बापट बोलत होते. यावेळी शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, उमा खापरे, सदाशिव खाडे, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, शहराध्यक्ष योगेश बाबर, उर्मिला काळभोर, सरिता साने, अमोल थोरात, आरपीआयच्या चांद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब रोकडे, लक्ष्मण गायकवाड, दयानंद वाघमारे, प्रकाश ओव्हाळ, के एम बुक्तर, अल्ताफ शेख, विनोद गायकवाड, बापू वाघमारे, दशरथ थानांबीर, प्रणव ओव्हाळ, शैलजा मोळक, शिवसंग्रामचे पांडुरंग मोळक पाटील, आशा शेडगे, शिवसेना-भाजप चे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. खासदार बारणे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 9) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून मावळ मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. तसेच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ महायुतीची मध्यवर्ती कचेरी सुरू करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button