breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

वॉलमार्ट आज फ्लिपकार्टला विकत घेणार

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रात अ‍ॅमेझॉनला टक्कर देणाऱ्या फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीला वॉलमार्ट विकत घेणार आहे. १५ अब्ज डॉलरमध्ये हा व्यवहार झाल्याची माहिती समोर येत असून वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाउज मॅकमिलन हे देखील भारतात आले आहेत.

फ्लिपकार्ट घेण्यासाठी अॅमेझॉननेही रस दाखवला होता. मात्र, अॅमेझॉनऐवजी फ्लिपकार्टने वॉलमार्टचा प्रस्ताव स्वीकारला. वॉलमार्टचे सीईओ मॅकमिलन यांचे बंगळुरुत आगमन झाले असून ते दिल्लीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कराराबाबत चर्चा देखील करणार आहेत. फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने नुकताच ई- कॉमर्स व्यवसाय वॉलमार्टला १५ अब्ज डॉलरला विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button