breaking-newsक्रिडामुंबई
वॉटसनच्या तुफानी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस
मुंबई : शेन वॉटसनने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर ८ गडी राखून आयपीएलच्या अकराव्या मोसमात विजेतेपद मिळवलं. हैदराबादने दिलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना वॉटसनने ५७ चेंडुंमध्ये वॉटसनने ११ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११७ धावांची खेळी केली. वॉटसनच्या या विक्रमी खेळीवर क्रिकेटविश्वातील व्यक्तींनी ट्विटरवर वॉटसनच्या खेळीचं कौतुक करत, चेन्नईचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.