breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वैद्यकीय फर्निचर खरेदीत रिंग होवूनही स्थायीची मंजुरी; विरोध डावलून सभापतींचा ‘हम करेसो कायदा’

  • भाजपसह राष्ट्रवादी नगरसेवकांचा फर्निचर खरेदीला विरोध
  • भाजपच्या पारदर्शक कारभाराला सभापतींनी दाखविला ठेंगा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून वैद्यकीय खरेदी करण्यात येणार आहे. त्या खरेदीत दोन ठेकेदारांनी संगणमताने रिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत भाजपसह राष्ट्रवादी नगरसेवकांनी विरोध दर्शविला. तर शिवसेनेने चिडीचूप भूमिका स्विकारली. तरीही स्थायी सभापती विलास मडेगिरी यांनी सर्वांचा विरोध डावलून हा प्रस्ताव मंजूर केला. तसेच भाजपच्या पारदर्शक धोरणास स्थायी सभापतींनीच ठेंगा दाखविला आहे.

महापालिका वैद्यकीय विभागासाठी मध्यवर्ती भांडार विभागाकडून नऊ प्रकारच्या फर्निचर साहित्य खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यता आली होती. त्यामध्ये 3 निविदाधारकांच्या निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यांच्यापैकी मे. रेखा इंजिनियरिंग वर्क्स व मे. निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन या दोन ठेकेदारांना हे काम विभागून देण्यात आले. त्यामध्ये नऊ प्रकारचे फर्निचर साहित्यामध्ये 31 लाख 7 हजार 920 रुपयांची खरेदी मे. रेखा इंजिनियरिंग वर्क्स या ठेकेदाराकडून केली जाणार आहे. तर, मे. निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन 31 लाख 37 हजार 937 रुपयांची फर्निचर घेण्यात येणार आहे.

त्यासह आणखी विविध विभागांसाठी 14 लाखांची फर्निचर खरेदी विभागून या दोनच ठेकेदारी संस्थांना देण्याचा प्रस्ताव भांडार विभागाने दिला. फर्निचर खरेदीत रिंग झाल्याचे आढळून येते. त्यामुळे या खरेदीला राष्ट्रवादीचे मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रज्ञा खानोलकर आणि भाजपच्या नम्रता लोंढे या सदस्यांनी विरोध केला. मात्र, तरीही दोन्ही बैठकांमधील या ठेकेदारांचे तिन्ही प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केले. विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांचाही विरोध असताना हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामुळे ठेकेदार व भांडार संगनमत दिसून येत असतानाही स्थायी समितीने या प्रस्तावांना मान्यता देऊन आणखी संशय ओढावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button