breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विषाणुजन्य परिस्थितीचे गांभिर्य डावलून भाजपची ‘ठोकशाही’, शहराची जम्बो कार्यकारणी जाहीर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाची जिल्हा कार्यकारिणी रविवारी (दि. 15) जाहिर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एका बैठकीत नविन पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये बारा उपाध्यक्ष, सोळा चिटणीस, पंधरा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशी एकूण 74 जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, लेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, गटनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे आदी उपस्थित होते.

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी करोना या भस्मासुराची भिती खाल्ली आहे. या जीवघेण्या संकटातून भोळ्याभापड्या मतदारांची सुटका कशी करावी. त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासाठी सर्व यंत्रणा रात्रीचा दिवस करत आहे. राज्यातील सर्व जनता भितीच्या छायेखाली आहे. शहरातील नागरिक शहर सोडून गावी परतू लागले आहेत. नागरिकांच्या भावनेची कसलीही तमा न बाळगता राज्यातील आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नेत्यांनी ठोकशाही मार्गाने राजकीय कित्ता गिरवला आहे. या भोळ्याभापड्या जनतेवर आलेल्या संकटाकडे दुर्लक्ष करून भाजपची कार्यकारणी जाहीर झाली आहे , अशी खोचक टिका सामाजिक स्तरातून होत आहे.

भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारणी खालीलप्रमाणे

उपाध्यक्ष :- शेखर चिंचवडे, राम वाकडकर, काळूराम बारणे, अनिल लोंढे, अर्जुन ठाकरे, किरण पाटील, अजय पाताडे, अण्णा गर्जे, कमल मलकानी, देविदास पाटील, नंदूशेठ दाभाडे, उत्तम केंदळे ; संघटन सरचिटणीस :- अमोल थोरात ; सरचिटणीस :- मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजू फुगे, बाबू नायर; चिटणीस :- अनिल चव्हाण, बिभीषण चौधरी, गोरख (दादा) तरस, योगेश सोनवणे, अजय सायकर, दत्ता गवाणे, विशाल वाळुंजकर, माणिक फडतरे, मधुकर बच्चे, कुलदीप परांडे, दीपक मोंडवे, नंदू कदम ; प्रसिध्दी प्रमुख :- संजय पटनी ; कोषाध्यक्ष :- सचिन तापकीर ; महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे,

अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष सुदाम यशवंत मराडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुभाष सरोदे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष फारुक इनामदार ; आय.टी. सेल :- शरद दराडे ; सोशल मिडीया सेल – अमोल दामले ; उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष :- विकास मिश्रा ; कामगार आघाडी उपाध्यक्ष :- प्रकाश अर्जुन मुगडे ; किसान मोर्चा अध्यक्ष संतोष तापकीर, दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष :- राकेश करुणाकरन नायर ; शिक्षक आघाडी अध्यक्ष :- धनंजय जगताप, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष :- डॉ. प्रदीप ननवरे; सहकार आघाडी अध्यक्ष :- सुर्यकांत संभाजी गोफणे ; सहकार आघाडी (गृह निर्माण) अध्यक्ष :- प्रदीपकुमार बेंद्रे ; सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष :- धनंजय शाळीग्राम ; वकील आघाडी – देविदास राजाराम शिंदे ; संयोजक प्रज्ञावंत आघाडी :- दीपक नारायण कुलकर्णी ; व्यापारी आघाडी अध्यक्ष :- राजेंद्र हरिभाऊ चिंचवडे ; उद्योग आघाडी अध्यक्ष :- निखील काळकुटे;

भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष :- रघुनंदन रामभाऊ घुले ; दिव्यांग प्रकोष्ठ :- शिवदास किसान हंडे ; आर्थिक प्रकोष्ठ :- संजीवनी इंद्रभूषण पांडे ; माजी सैनिक प्रकोष्ठ :- सोपान गेणुजी धामणे ; ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठ :- दीपक भोंडवे ; झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष मनोज पवार ; जिल्हा कार्यकारिणी सदस्य :- रोहिदास तरस, राजेंद्र राजापुरे, पाटील बुवा चिंचवडे, धर्मा पवार, विशाल कलाटे, जयनाथ काटे, हर्षल सुरेश नढे, सुरेश म्हेत्रे, लालासाहेब मोरे, राहुलशेठ गवळी, शितल वर्णेकर, नाना सासवडे, देवदत्त लांडे, आबा कोळेकर, राधिका बोरलीकर ; कार्यालयीन प्रमुख :- संजय अंबादास परळीकर अशी एकूण 78 जणांची शहर कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button