breaking-newsपिंपरी / चिंचवड

विविध मागण्यांसाठी थरमेक्स चौकात कष्टकरी कामगारांचे आंदोलन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना टाळेबंदीच्या कालावधीमध्ये श्रमिक कष्टकऱ्यांच्या हातातली कामे गेली, पगार थांबले, छोटे व्यावसाय बंद झाले, घरभाडे थकले, खात्यावर पैसे जमा नाही झाले, कांगाराचे ४४ कायदे मोडून ४ कायद्यामध्ये त्याचे रुपांतर करण्यात येत आहे लॉकडाउनच्या किंवा संकटाच्या काळात सुद्धा कष्टकऱ्यांच्या हिताचे कायदे मोडीत काढून त्यांना गुलामीत ढकलण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. याचा निषेध म्हणून आणि कष्टकरी वर्गाला सामाजिक सुरक्षा कायदा लागू करावा म्हणून थरमैक्स चौक चिंचवड येथे आज आंदोलन करण्यात आले. देशभरात आज विविध राज्यात हे आंदोलन करण्यात आले.

वर्किंग पीपल्स चार्टर, जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे हे अंदोलन करण्यात आले.कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, नगरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, सचिन नागणे, उमेश डोर्ले, नाना कसबे, वंदना थोरात, राजाभाऊ हाके, ओम प्रकाश, पोपट सकट, आरती देडे, शरणाव्वा दोडमनी आदीसह शहरातील कष्टकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले करोना ताळेबंदित जगण्याचे हाल झाले. श्रमिकांच्या हाती काही मिळालेले नाही , सरकारची संवेदनशून्यता दिसत आहे दीर्घकाळ सुरू असलेली टाळेबंदी चे निमित्त करून कामगार संघटना आणी त्यांच्या हक्कावर गदा येत आहे केंद्र सरकार सुद्धा राज्य सरकारांच्या उपयोग करून घेत आहे त्या मार्फत हल्ला केला जात आहे विविध राज्यांमध्ये कामगार कायद्यातून सूट देण्यात येत असून तशा प्रकारच्या अध्यादेश काढण्यात आले असून अनेक ठिकाणी ठराविक दिवसासाठी कामगार कायदे स्थगित करण्यात आले आहेत यातुन गुलामगिरी कडे जात आहोत. श्रमिक कष्टकरी यांचे जीवन आधांतरी झाले असून सामाजिक सुरक्षा बाबत केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सुद्धा त्यांना काहीही मिळत नाही किमान वेतन समान वेतनाचा सुद्धा बाबतीमध्ये शासन अनुकूल नाही म्हणून कामगारांच्या विविध मागण्यासाठी यामध्ये कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार, मजूर, मोळकरिन, रिक्षाचालक, फेरीवाला विडी कामगार, शेतमजूर अशा विविध घटकांना सामाजिक सुरक्षा लागू करावी म्हणून निषेध दिवस पाळुन आंदोलन करण्यात आले. कामगाराना सुरक्षा द्यावी, फेरीवाला, मजुर, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, रिक्षाचलक, कंत्राटी कामगार, शेतमजुर यासह सर्व असंघटीत कामगाराना सामाजिक सुरक्षा लागू करावी अन्यथा देशात उद्रेक होईल.

मानव कांबळे म्हणाले, करोना टाळेबंदी काळात असंघटीत कामगारांच्या खात्यावर किमान वेतन जमा झाले नाही, राशन ची घोषणा होते प्रत्यक्ष मिळत नाही त्यातही गहू किँवा तांदूळ मिळनार पेट्रोल, डिझेल दर कमी करुन महागाई नियंत्रणात आणली नाही मोठे पुढारी यांच्या सोबत सोशल डीस्टासिंग चा फज्जा उडत आहे आणी कष्टकरी कामगाराना काही मागायचे झाल्यास अनेक विघ्न आहेत. कामगारानी यापुढे स्वस्थ बसुन चालणार नाही लढाई तिव्र करावी लागणार आहे.जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे .

यावेळी शीष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार गीता गायकवाड याना देऊन चर्चा केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button