Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करु नयेत – एकनाथ पवार

पिंपरी – शहरातील कचरा संकलन व वहन करण्याच्या कामासाठी दोन निविदा काढल्या होत्या. त्या निविदेचा दर अधिक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानूसार संबंधित ठेकेदारांना सांगून त्या निविदेत कच-यांचा दर कमी करता येईल का? तसा प्रयत्न करण्यात आला. परंतू, संबंधित ठेकेदारांनी दर कमी न केल्याने भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुचनेनुसार कच-यांची निविदा रद्द करण्यात आली. त्यामुळे कच-याची निविदा रद्द केल्यानंतर त्यात भ्रष्टाचार कसा होईल, असा प्रतिप्रश्न करत बिनबुडाचे आरोप त्यांनी करु नये, असा सल्ला सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कचरा, पिण्याचे पाणी यासह अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला. परंतू, सत्ताधारी भाजपच्या काळात दैनंदिन कचरा उचलला जात नाही. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी पैसे खाण्यात गुंतले आहेत. असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी भाजपवर केला होता. यावर आज (शनिवारी) सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, कचरा सलंकन व वहन करण्याची निविदा रद्द केली आहे. खरे तर निविदा रद्द केल्यानंतर त्या निविदेत भ्रष्टाचार कसा होईल, उलट सत्ताधारी भाजपने महापालिकेत करदात्यां नागरिकांचे पैशा वाचविण्यासाठी प्रत्येक कामात काटकसरीचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे बिनबुडाचे आरोप विरोधी पक्षनेत्यांनी करु नये, असा सल्ला सत्तारुढ पक्षनेते पवार यांनी त्यांना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button