breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्याने ‘ईव्हीएम’ मशीनवर खापर

  • विरोधकांचे कसं आहे, ‘नाचता येईना अंगण वाकडे’
  • भाजप प्रवक्ते माधव भंडारीचा आरोप  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम आणि निवडणुक आयोगाबाबत काॅंग्रेससह सर्वच विरोधक संशय निर्माण करीत आहेत. त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात व्हीव्हीपॅटविषयी दाखल केलेली याचिका फेटाळली असून त्याची ही याचिका निरर्थक होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्याने त्यांनी ईव्हीएम यंत्रावर खापर फोडण्याचे कामास अगोदरपासूनच सुरुवात केलीय. त्यामुळे विरोधकांचे कसं आहे, ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी टिका भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. 

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईन आणि वाॅर रुम उद्घाटन भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, महापाैर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी महापाैर नितीन काळजे, शिक्षण सभापती सोनाली गव्हाणे, ई प्रभाग अध्यक्ष सुवर्णा बुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

भंडारी म्हणाले की, महाराष्ट्रातील 288 आमदारापेक्षा सगळ्यात आधुनिक व सुसज्ज वाॅर रुम उभी केलीय, ही वाॅर रुम 24 तास सुरु आहे. तसेच परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या 27 हजार समस्या सोडविल्या आहेत. या वाॅर रुमच्या माध्यमातून नागरिकांपर्यत थेट पोहोचून विधानसभा निवडणुकीत निश्चित फायदा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रचाराची एक फेरी झालेली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी वाॅर रुम वापर निश्चितच होणार आहे. त्यातून महेश लांडगे हे यश मिळवतील, भोसरी विधानसभा जागा शिवसेनेकडे असली, तरी आमदार महेश लांडगे  आमच्या सोबत आहेत. ते विधानसभेची तयारी करणारच, त्यात काहीच वाद नाही.

लोकसभा निवडणुकीत जास्त काही फरक पडणार नाही. भाजप-शिवसेनेला 42 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर विरोधकांना 6 जागापेक्षा कमी मिळतील, तसेच काॅंग्रेससह सर्व विरोधक आयोगा सारख्या संस्था मोडून काढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आणण्याचे काम हे विरोधक करु लागले आहेत. या विरोधकांना जनता बळी पडणार नाही. असेही माधव भंडारी म्हणाले.

भोसरी विधानसभेवर दावा माझाच… आमदार महेश लांडगे

मागील 2014 विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही वाॅर रुम चालविली होती. त्याला भोसरी विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आता अत्याधुनिक आणि सुसज्ज वाॅर रुम सुरु केली आहे. सध्या ही वाॅर रुम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे. तसेच ही वाॅर रुम कोणालाही डिवचण्यासाठी सुरु केलेली नाही. आम्ही जनतेच्या समस्या आणि थेट त्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी काम करणार आहोत. महायुतीत भोसरीची जागा शिवसेनेकडे असली, तरी देखील विद्यमान आमदार म्हणून त्यावर माझा दावा कायम राहणार आहे. असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.    

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button