breaking-newsराष्ट्रिय

विरोधकांची मोट : कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाला चंद्राबाबू येणार?

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आता कॉंग्रेस-जनता दल सेक्युलर यांच्या सत्ता स्थापनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, यानिमित्ताने सर्व विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत.

कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाला कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती यासारखे दिग्गज नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यात आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपप्रणित एनडीएला रामराम करणारे चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत नायडू यांनी रविवारी रात्री उशिरा तेलगु देसम पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे चंद्राबाबू हे कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता वाढली आहे.

याबद्दल तेलगु देसम पक्षाच्या एका मंत्र्याने देखील दुजोरा देत सांगितले, की कुमारस्वामी यांनी चंद्राबाबू यांना वैयक्तिक निमंत्रण दिले आहे. हा समारंभ २३ मे रोजी होणार आहे. जर चंद्राबाबू या समारंभाला उपस्थित राहिले, तर देशात एक वेगळा संदेश जाणार आहे, असा विश्वासही तेलगु देसमच्या या मंत्र्याने व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button