breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधानसभेसाठी शिवसेनेच्या वाघांची “डरकाळी ”

  • पिंपरी, चिंचवडमध्ये शिवसंपर्क अभियानचा प्रारंभ
  • पक्षाचे काम घराघरात पोहोचविण्याची शिवसैनिकांवर जबाबदारी  

पिंपरी (महा ई न्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वाघांनी डरकाळी फोडली आहे. कार्ला येथील एकविरा मातेच्या पायावर नतमस्तक होऊन शिवसैनिकांनी शिवसंपर्क अभियानाची तुतारी फुंकली. मावळ लोकसभा मतदार संघासह आता पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील घराघरात शिवसेनेचे कार्य पोहोचविण्याचे धनुष्य या मतदार संघातील पदाधिका-यांच्या खांद्यावर दिले आहे. जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यासाठी कार्यकर्ते हिरीरीने कामाला लागले आहेत.

 

खरे तर शिवसंपर्क अभियानाची सुरुवात २३ ऑगस्ट रोजी कार्ला येथील एकविरा देवीमातेचे दर्शन घेऊन झाली. पहिल्या टप्प्यात मावळ तालुका विधानसभा क्षेत्रामध्ये आठ दिवस शिवसंपर्क अभियान उत्साहात संपन्न झाले. त्याच धर्तीवर पिंपरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रातील नियोजन करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) दुपारी दोन वाजता आकुर्डीतील शिवसेना भवनात कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक झाली. सध्या पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये शिवसंपर्क अभियान सुरु आहे. त्यासाठीच प्रत्येक विधानसभेतील ज्येष्ठ शिवसैनिक, विधानसभा प्रमुख, संघटक, समन्वयक, नगरसेवक, उपशहर प्रमुख, महिला आघाडी उपशहर संघटक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना शहर अधिकारी, भा. वि. सेना शहर संघटक, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी पदाधिकारी व आजी-माजी पदाधिकारी यांच्या  सूचना, संकल्पना समजून घेण्यात आल्या. वेगवेगळ्या पदाधिका-यांवर क्षमतेनुसार जबाबदा-या सोपविण्यात आल्या.

 

बैठकीत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी काही सूचना केल्या. पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली. सर्व स्तरावर संघटना मजबूत करून कामास लागा असे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून आपली संघटना मजबूत करा नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडा, जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरा सत्ताधऱ्यांच्या चुकीच्या कामाला विरोध करा. व घराघरात शिवसेनेने केलेली कामे पोहचवा. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून वार्डात, प्रभागात शिवसेनेचे अस्तित्व असे निर्माण करा की, नागरिकांना शिवसेनेशिवाय पर्याय उरणार नाही.

 

शहरप्रमुख  योगेश बाबर यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या वाटचालीवर जोर दिला. शहर प्रमुख  संघटिका सुलभा उबाळे यांनी मनोगत व्यक्त करताना महिला संघटन  किती महत्वाचे आहे.  त्याकरिता सर्वांना सामावून महिलांचे संघटन बळकट करणार असल्याचे आणि महिलांच्या ज्वलंत प्रश्नांवर व अन्यायाविरुद्ध आंदोलने करणार असल्याचे नमूद केले. जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी शिवसंपर्क अभियानाची धुरा सांभाळत मनोगत व्यक्त केले. आपण या संपूर्ण अभियानात सहभागी होणार आहे. वेळेच्या नियोजनानुसार शिवसेनेचे खासदार, आमदार व नगरसेवक हे देखील सहभागी होणार आहेत. त्यांनी शिवसंपर्क अभियानामध्ये त्या त्या परिसरातील नागरिकांच्या सूचना व समस्या, पालिकेत होत असलेला भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची कामे होत असलेली शासकीय कामांचा पाठपुरावा केला. तसेच, शिवसैनिकांच्या अडचणी लक्षात घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन शिवसेना पक्षबांधणी व आंदोलने याबाबत दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

यावेळी मधुकर बाबर, कार्यालयीन प्रमुख बशीर सुतार,  सावल तोतानी, खंडू शिरसाठ, विजय जम, सोनू शिरसाठ, मानसिंग मोरे, प्रदीप पऊजा, प्रकाश म्हस्के, गणेश राकडे, श्रीमंत गिरी, नगरसेवक अॅड. सचिन भोसले, प्रमोद कुटे, माऊली जगताप, रुपेश कदम, भाविक देशमुख, शरद जगदाळे, पार्थ गुरव, राजेश वाबळे, अक्षय जगताप, गोरख पाटील, फारुख शेख, दादासाहेब मोहिते, सय्यद पटेल, राम पात्रे, सोनू संधू, सुरेखा उदावंत,  आर. एम. कदाडी, शेखर महाडिक, अमोल निकम, नवनाथ तरस, विजया चव्हाण, विद्या जाधव, विमल जगताप, अनिता तुतारे,  कमला गोडांबे, सुशीला पवार, मंगल काळंगे, पुष्पा तारू, नूरजहाँ शेख, हरेश नखाते, अंकुश कोळेकर, गणेश वायभट, गोरख पाटील, प्रदीप दळवी, वैभवी घोडके, वैशाली कुलथे, शारदा वाघमोडे, बेबी सय्यद, राजू सोलापुरे, गजानन धावडे आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button