breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विधानपरिषद निवडणूक, भाजपचे अमरिश पटेल विजयी

मुंबई – विधानपरिषद धुळे- नंदुरबार मतदारसंघाची पोटनिवडणूकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांना 332 तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मते मिळाली.

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी आठपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सुरुवात झाली.

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघात महाविकास आघाडीला मागे टाकत भाजपचे नेते, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिश पटेल यांनी विजय मिळविला. ऐन विधानसभेच्या तोंडावर पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

धुळे- नंदुरबार मतदारसंघात भाजपचे १९९, कॉंग्रेसचे १५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, असे मिळून महाविकास आघाडीचे २१३, एमआयएमचे ९, समाजवादी पार्टीचे ४, बसप १, मनसे १, अपक्ष १० मतदार आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button