breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विधानपरिषद निकाल : अमरावती, चंद्रपूरमध्ये ‘कमळा’ने मारली बाजी

मुंबई : विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे तर वर्धा येथे भाजपचे रामदास आंबटकर विजयी झाले आहेत.

चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत व महानगरपालिका सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले होते. या निवडणुकीत रामदास आंबटकर यांना ५२८ मते मिळाली. तर काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली. तर विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात लढत होती. या लढतीत प्रवीण पोटे यांनी ४५८ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. या दोन्ही जागांवरील विजय भाजपसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button