breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

विद्येच्या माहेर घरात शिक्षक संघटनेचा ‘तो दलाल कोण’ ?

– ‘अर्थपुर्ण वाटाघाटी’मुळे शिक्षकांच्या ‘ज्ञानदानावर प्रश्नचिन्ह

– भाजप पदाधिका-यांचा ‘वरुन पारदर्शक कारभार’ ‘आतून भ्रष्ट कारभार’

पिंपरी ( महा ई न्यूज ) – जिल्हा परिषदेतून महापालिकेत शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरणाच्या विषयाला सर्वसाधारण सभेत विना चर्चा मान्यता दिली. त्या विषयावरुन प्रत्येकी एका शिक्षकाकडून सुमारे पाच ते दहा लाख रुपये भाजप पदाधिका-यांनी घेतल्याचा आरोप होवू लागला. मात्र, विद्येच्या माहेर घरात शिक्षक वर्गीकरणातून कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटण्यासाठी सर्वांशी अर्थपुर्ण वाटाघाटी घडवून आणणारा शिक्षक संघटनेचा प्रमुख असलेल्या तो दलाल कोण ? अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबरची तहकूब सभा गुरुवारी (दि.20) पार पडली. त्या सर्वसाधारण सभेतील विषय पत्रिकेवरील सहा नंबरचा शिक्षक वर्गीकरणाचा विषय सभागृहात वाचण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीने या विषयावर चर्चेची मागणी केली. भाजप महापैारानी चर्चेची मागणी धुडकावून लावत तत्काळ विषयाला मान्यता दिली. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेवून आंदोलन केले.

महापालिका शिक्षण समितीतील शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरणाला अर्थपुर्ण वाटाघाटीचा कलंक लागला आहे. संपुर्ण पुणे शहर विद्येचे माहेर घर म्हणून परिचित आहे. या विद्येच्या माहेर घरात ज्ञानदानाचे कार्य करणा-या शिक्षकांना देखील भाजप पदाधिका-यांनी सोडले नाही. ‘वरुन पारदर्शक कारभार’ ‘आतून भ्रष्ट कारभारा’चा नमुना पाहावयास मिळाला. शिक्षण समिती काही पदाधिका-यांनी केलेल्या अर्थपुर्ण वाटाघाटीने त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटल्याचे दिसत आहे.

या विषयात शिक्षण समितीमध्ये बसून पडद्यामागून शिक्षक संघटनेच्या एका प्रमुख पदाधिका-याने शिक्षकांची समेट घडवून दिली आहे. त्या शिक्षक संघटनेच्या पदाधिका-याने ज्ञानदानाचे पावित्र्य न राखता अर्थपुर्ण वाटाघाटीला पाठबळ दिले. स्वताः शिक्षकांच्या न्याय-अन्यायासह हक्कासाठी संघटनेचे काम करताना शिक्षकांच्या विषयात त्याने चक्क दलाली केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, भाजप शिक्षण समिती पदाधिका-यांचा एकीकडे महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्याचा हट्टाहास करायचा, अन्ं दुसरीकडे एका शिक्षकांकडून लाखो रुपये उकळायचे, असे केल्याने त्या शिक्षकांच्या ज्ञानदानावर ख-या अर्थाने प्रश्नचिन्ह निर्माण होवून ते प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकविणार का ? अशीही चर्चा सुजाण नागरिकांतून होवू लागली आहे.

  • शिक्षक वर्गीकरण विषयात विरोधकांना बोलू न देता महापैार राहूल जाधव यांनी दादागिरी करुन विषय रेटण्याचा प्रकार केला. शिक्षण समिती पदाधिका-यांनी मानधनावरील शिक्षक भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार केला. शिक्षक सेवा वर्गीकरणाच्या नावाखाली एका शिक्षकांकडून पाच ते दहा लाख रुपये घेतले आहेत. भाजपचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येईल म्हणून आम्हाला बोलू दिले नाही.

           दत्ताकाका साने विरोधी पक्षनेते महापालिका

  • महापालिका सर्वसाधारण सभेत सदस्य प्रस्ताव असलेला शिक्षक वर्गीकरण विषय माझ्याकडे आल्यानंतर तो तपासून पाहिला जाईल, तो कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही, हे पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

          श्रावण हर्डिकर – आयुक्त महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button