breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भात लोकसभेच्या 7 जागांवर मतदान, ईव्हीएममध्ये बिघाडाच्या 39 तक्रारी

नागपूर – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. एकूणच 20 राज्यांमध्ये 91 मतदार संघात मतदान होत आहे. यामध्ये विदर्भातील 7 जागांचा समावेश आहे. या जागांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि हंसराज अहीर यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 अशी असली तरीही गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आलमोरी, अहेरी व भंडारा-गोंदिया मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेतच मतदान झाले. हे दोन्ही मतदारसंघ अतिसंवेदनशील असून अशा मतदान केंद्रांची संख्या 500 हून अधिक आहे.

विदर्भात ईव्हीएममध्ये बिघाडाच्या 39 तक्रारी
विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम बिघाडाबाबत 39 तक्रारी आल्या आहेत. प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. यात वर्धातून 6, रामटेकमधून 5,
नागपूरातून 12, यवतमाळ-वाशिम येथून 4, चंद्रपूरातून 8, गडचिरोलीतून 4 अशा तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

यापूर्वी असे होते विदर्भाचे चित्र
विदर्भातील सर्वच 7 जागांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाना पटोले आणि माणिकराव ठाकरे यांच्या दिग्गज नेत्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. सर्वच मतदान केंद्रांवर त्यातही प्रामुख्याने नक्षली हल्ल्याच्या भीतीने अतिसंवेदनशील भागांत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 2014 मध्ये सर्व 7 जागांवर शिवसेना-भाजप युतीचे खासदार जिंकले होते. 2018 च्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. गतवेळी दिग्गज नेत्यांना बसपचे आव्हान होते, तर यंदा वंचित आघाडीचे आहे.

विदर्भात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 60 टक्के मतदान

वर्धा – 55.36 टक्के

रामटेक – 51.72

नागपूर – 53.13

भंडारा-गोंदिया – 60.50

गडचिरोली-चिमुर – 61.33

चंद्रपूर – 55.97

यवतमाळ वाशिम -53.97

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button