breaking-newsताज्या घडामोडी

विठुरायाच्या परंपरागत चंदनउटी पूजेला सुरुवात,भाविकांना प्रवेश नाही

पंढरपूरमध्ये श्री विठुरायाच्या परंपरागत चंदनउटी पूजेला सुरुवात झाली. गुरूवारी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रूक्मिणीच्या चंदन उटी पूजेचा प्रारंभ झाला. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी चंदन उटी पूजा केली जाते. यावेळी मंदिरातील महालक्ष्मी, व्यंकटेश, राधिकामाता, सत्यभामा यांना देखील चंदनउटी पूजा करण्यात आली. श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीतर्फे दरवर्षी मार्चपासून ते जून महिन्यापर्यंत चंदन उटी पूजा करण्यात येते..मात्र कोरोनामुळे मंदीरतील ही पुजा भाविकांच्या हस्ते होणार नाहीये…

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिरात भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा रद्द करण्यात आल्या. श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या रोजच्या चंदनउटी पूजेसाठी ७५० ग्राम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. पुढचे तीन महिने उन्हाची तीव्रता अधिक असते त्यामुळे श्री विठुरायाला उष्म्यापासून दिलासा मिळावा म्हणून चंदनाचा लेप त्याच्या संपूर्ण अंगाला लावण्यात येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button