breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विकास साधण्याची धमक फक्त राष्ट्रवादीमध्येच – पार्थ पवार

  • काटे पिंपळेत जाहीर सभेत केले विधान ! 
  • लोकांपर्यंत काम पोहोचविण्याची केली सूचना
पिंपरी , ( महा – ई – न्यूज ) – मी शिकत असताना वाकड येथे हॉस्टेलमध्ये राहत होतो . येथील मोकळ्या मैदानावर मित्रमंडळी फुटबॉल खेळायचो . त्यावेळी आजूबाजूला ओसाड मैदान । आणि रात्रीला सन्नाटा असायचा . त्यावेळच्या परिस्थितीचा विचार केला तर आज हा विकास पाहून विश्वास बसणार नाही . हा विकास साधण्याची धमक फक्त राष्ट्रवादीच्याच मनगटात आहे , अशा शब्दात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले .
मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार पिंपरी चिंचवड मधील काटे पिंपळे येथे आयोजित सभेत बुधवारी रात्री बोलत होते . यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे , नाना काटे , संदीप पवार , प्रशांत शितोळ , मयूर कलाटे आदी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले की , पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांबाबत विरोधकांनी विरोधात बोलून लोकांच्या डोळ्यावर झापड ओडली गेली आहे . लोकांना या विकास कामांबाबत जागृत करावे लागेल . हा बदल घडविण्याची धमक फक्त राष्ट्रवादीच्याच मनगटात आहे , हे त्यांना ठणकाऊन सांगा , अशी सूचना त्यांनी कार्यकत्र्यांना केली .
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button