Uncategorizedपुणे

वाळू माफियाचा महसूल अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न

इंदापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्याच अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 5 जानेवारी रोजी इंदापुरातील हिंगणगाव हद्दीत हा प्रकार घडला आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी शिलाजीत वामन सोनवणे, स्वप्निल संजय आरडे, विकास नारायण आरडे यांच्यासह एकूण सहा जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण रामभाऊ वेडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

उजनी जलाशयातून वाळू चोरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार अरुण वेडे, मंडल अधिकारी जात असताना त्यांना समोरून एक वाळूचा ट्रॅक्टर जाताना दिसला. त्यांनी या ट्रॅक्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या अंगावरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला आणि ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. दरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आता ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला असता ट्रॅक्टरवरील एकाने ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीची पिन काढली. त्यानंतर वाळू भरलेली ट्रॉली सरकारी जीपवर येऊन धडकली. अधिकाऱ्यांनी वेळीच गाडीतून उड्या मारल्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button