breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम डॉक्टरांचे आंदोलन’ म्हणजे माझ्याविरोधात रचलेले कुंभाड – नगरसेवक संदीप वाघेरे

मला नोटीस बजावण्याचा पक्षनेत्यांना अधिकार आहे का? वाघेरेचा सवाल

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन म्हणजे माझ्याविरोधात रचलेले कुंभाड आहे. पक्ष आणि जनतेच्या हितासाठी मी काम करत असताना मला शिस्तभंगाची नोटीस बजाविणे हे माझ्यासाठी क्लेषकारक असल्याचे मत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी व्यक्त केले आहे.

दोन दिवसांपूर्वी वायसीएम रुग्णालयात नगरसेवक संदीप वाघेरे आणि डॉक्टरांमध्ये रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली होती. यानंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले होते. भाजपाच्या काही नेत्यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटविले होते. यानंतर भाजपाचे महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके यांनी शिस्तभंगाची नोटीस वाघेरे यांना पाठविली होती. याबाबत वाघेरे यांनी आज पक्षाकडे खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी माझ्या वॉर्डातील एका महिलेला योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार माझ्याकडे आल्यामुळे मी वायसीएम रुग्णालयात गेलो होतो.

वॉर्डात गेल्यानंतर त्या ठिकाणी एकही डॉक्टर अथवा नर्स नसल्याचे लक्षात आल्यानंतर याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता दहाच्या दरम्यान संबंधित महिला खाटावरून पडल्याने मयत झाल्याचे निदर्शनास आले. आम्ही वॉर्डाजवळ आल्याचे लक्षात आल्यानंतर एक डॉक्टर त्या ठिकाणी येऊन संबंधित महिलेला आयसीयुमध्ये दाखल करण्याचे नाटक करू लागले. मात्र मृत महिलेला आयसीयुमध्ये दाखल का करताय? असा प्रश्न विचारल्यानंतर संबंधित डॉक्टरने उद्धट उत्तरे दिली. यानंतरही मी कोणताही गोंधळ न करता माझी भूमिका मांडली. मात्र डॉक्टरांनी दुसर्‍या दिवशी केलेले आंदोलन हे माझ्याविरोधात रचलेले कुंभाड होते.

संबंधित डॉक्टर हा पीजी इन्सिट्यूटचा होता. पीजीमधील डॉक्टरांना कायम करू नये यासाठी मी गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून वारंवार आवाज उठवित आहे. महापलिकेवर कोट्यवधी रुपयांचा बोजा वाढणार आहे, हा वाढू नये यासाठी मी प्रयत्न करत असल्यामुळे या डॉक्टरांना माझ्याबद्दल राग असून त्यातून हा प्रकार त्यांनी घडवून आणल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे. नगरसेवक या नात्याने लोकांचे प्रश्न सोडविणे हे माझे काम असून लोकशाही मार्गाने मी माझे काम करत राहिन. लोकांनी मला शहरातील सर्वाधिक मताधिक्य दिले असल्याने माझी त्यांच्याशी बांधिलकी आहे. पक्षाशीही मी निष्ठेने वागत असतानाही मला पक्षशिस्तीसंदर्भात पाठविलेली नोटीस क्लेशदायक असून संपूर्ण घटनेचे माझ्याकडे व्हिडीओ रेकॉर्डींग असल्याचेही त्यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

पक्षनेत्यांना अधिकार आहे का?
पक्षशिस्तीसंदर्भात नोटीस बजाविण्याचा अधिकार शहराध्यक्ष अथवा पक्षपातळीवर वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला असतो. नामदेव ढाके हे महापालिकेतील सत्तारुढ पक्षाचे गटनेते तथा पक्षनेते आहेत. त्यांनी पक्षशिस्तीसंदर्भात काढलेली नोटीसच पक्षाच्या घटनेबाहेरील असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षनेता नोटीस बजावू शकतो का आणि ढाके यांनी बजाविलेली नोटीस कोणत्या अधिकाराने बजाविली याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button