breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाढती गुन्हेगारी आणि साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवा

  • शिवसेनेचे खासदार, आमदार आक्रमक
  • पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांना केल्या सूचना

पिंपरी, (महा ई न्यूज) – लहान मुलींवर होणारे बलात्कार, खून तसेच स्वाईन फ्लू व डेंगीच्या रोगाने शहरात घातलेले थैमान याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार-आमदारांनी आज पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांच्याबरोबर युद्धपातळीवर बैठका घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे.

खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज याप्रकरणी दोन्ही आयुक्तांना निवेदने देऊन तातडीने हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी आग्रही मागणी केली.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सकाळी साडेअकरा वाजता त्यांची भेट घेतली. मागील वीस दिवसात शहरात पाच लहान मुलींवर झालेले अत्याचार या गंभीर बाबींबद्दल पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पोलीस आयुक्त कार्यालय होऊनही गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली असल्याचे त्यांनी आयुक्त पद्मनाभन यांच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी कारवाईची प्रगती याबद्दल आयुक्तांनी आमदार खासदार यांना माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यावेळी उपस्थित होते.

यानंतर शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आपला मोर्चा वळविला. शहरात स्वाईन फ्लू व डेंगीच्या प्रार्दूभावाने कळस गाठला असून पालिकेची रूग्णालये हाऊसफुल झाल्याची बाब त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. स्वाईन फ्लूच्या लसींचा तुटवडा, जनजागृतीसाठी काय तयारी चालू आहे? याची माहिती आयुक्तांनी दिली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button