breaking-newsपुणे

वाकड पोलिसांनी पकडले 10 कोटींचे रक्तचंदन जप्त

पिंपरी- बेकायदेशीररित्या रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर वाकड पोलिसांनी सापळा रचून पकडला. या कंटेनरमध्ये सुमारे 10 कोटीचे रक्तचंदन असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ताथवडे जवळ आज (गुरुवार, दि. 26) सकाळी साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईहून मुंबईच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी ताथवडे जवळ पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास सापळा रचला. ताथवडे येथे कंटेनर आला असता पोलिसांना तो अडवला. त्यामध्ये पाहणी केली असता रक्तचंदन आढळून आले. याबाबत पोलिसांनी वनविभागास कळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रक्तचंदनाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हे रक्तचंदन सुमारे 10 कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज वर्तविला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button