breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडच्या विकास कामाबाबत आयुक्तांनी खोटा आणि दिशाभूल करणारा दिला अहवाल, महापाैरांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री, नगरविकासमंत्र्याना महापाैर माई ढोरे यांचे पत्र

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

वाकड येथील रस्ते विकासाच्या संदर्भात महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राज्य शासनाला दिशाभूल करणारा अहवाल दिल्याचा आरोप महापौर माई ढोरे यांनी मंगळवारी केला. मात्र, स्थायी समितीमध्ये मंजूर झालेला वस्तुनिष्ठ अहवाल सादर केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

वाकड येथील रस्ते काँक्रीटीकरणाच्या मुद्यावरून महापालिकेत भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप झाले. यावरुन स्थायी समितीत मतदानाद्वारे विकास कामांना मंजूरी देण्यात आली. तर रस्ते विकास कामांना भाजप नगरसेवकांनी विरोध दर्शविला. सदरील प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यावर आता महापौर माई ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आयुक्त हर्डीकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता दाट आहे.

वाकड येथील प्रभाग क्रमांक २५ मध्ये विशेष योजनेंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणाची कामे करावीत, असा प्रशासकीय प्रस्ताव २७ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर होता. या चर्चेच्या वेळी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये रस्ते काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरणाची कामे करावीत, अशी सूचना अध्यक्ष संतोष लोंढे यांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून प्रस्ताव दप्तरी दाखल झाल्याचा अहवाल आयुक्त हर्डीकर यांनी राज्याच्या नगरविकास खात्याला दिला, असे महापौरांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

शहरात सध्या करोनाचा प्रादुर्भाव आहे. आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत एकाच प्रभागात शंभर कोटी रुपये खर्चाची विशेष योजना राबविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरणाची कामे करावीत. त्यामुळे खर्चात बचत होईल. याशिवाय एकाच प्रभागात शंभर कोटी रुपयांची कामे केल्यास शहरातील अन्य प्रभागतही त्याप्रमाणे मागणी होईल, अशी भीती व्यक्त करून आयुक्तांचा अहवाल फेटाळावा आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

एकाच प्रभागात शंभर कोटी रुपयांची विकासकामे करणे संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे रस्ते काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्याची सूचना स्थायी समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली होती. मात्र, आयुक्तांनी शासनाला दिशाभूल करणारा अहवाल दिल्याचा आमचा दावा आहे. – माई ढोरे महापाैर पिं.चिं.महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button