breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडच्या नामांकीत हॉटेलमध्ये विवाहितेवर बलात्कार; क्लीप व्हायरल करण्याची दिली धमकी

  • नराधम आरोपी वाकड पोलिसांच्या ताब्यात
  • पतीसह तीन साक्षिदारांचे आज घेणार जबाब

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – ‘तु मला समजून घे, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी संबंध ठेवले तर तुला मुल होईल’, अशी मखलाशी मारत विवाहितेशी लगट साधून एका तरुणाने तिच्यासोबत संबंध प्रस्तापित केले. त्याचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून हा प्रकार कोणाला सांगितला तर सोशल मीडियावर क्लीप व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार वाकड येथील डांगे चौकाजवळ हॉटेल पायोनियर येथे गुरूवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

किरण कृष्णा भालेकर (वय 42, रा. सर्वे नं. 44, सोमनाथनगर, वडगाव शेरी, पुणे) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय पीडित विवाहितेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेकरने वाकड येथील डांगे चौकाजवळच्या हॉटेल पायोनियरमध्ये शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित विवाहितेला ‘तु समजून घे, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी संबंध ठवले तर तुला मुल होईल’, असे म्हणून तिला जाळ्यात अडकवले. तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर बलात्कार केला. त्याचे मोबाईलद्वारे चित्रीकरण देखील केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देखील त्याने विवाहितेला दिली. विशेष म्हणजे हॉटेलमधील ज्या घोलीत ते दोघे होते. त्या खोलीच्या दरवाजाची आतली कडी लावून विवाहितेला बाहेर जाण्यास रोखल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, हा प्रकार हॉटेलमध्ये घडल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात तीन साक्षिदार आहेत. त्यामध्ये संबंधित विवाहितेचा पती देखील साक्ष देणार आहे. अन्य दोन साक्षिदार तपासल्यानंतर खरी माहिती समोर येईल. आरोपीच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण झाले असेल तर त्याचाही पुरावा म्हणून उपयोग होईल. हे सर्व पुरावे साक्षिदारांसह न्यायालयासमोर सादर केले जातील. त्यानुसार पुढील कारवाई होईल, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. शेटे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button