breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

वसईच्या नवाळे गावात साचलेल्या पावसाच्या पाण्यात आढळून आले पिवळे बेडूक…

मुंबई आणि उपनगरात काही दिवसांपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. पावसाच्या जोरामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं.एका ठिकाणी शेतात साचलेल्या पाण्यात अत्यंत दुर्मिळ पिवळ्या रंगाचे बेडूक दिसल्याचा विडिओ चागलाच चर्चेत आला आहे. अनेकदा साचलेल्या पावसाच्या पाण्यात अनेक प्राणी, किडे, कीटक पाहायला मिळतात, त्यातीलच हे पिवळ्या रंगाचे बेडूक आहेत. नेहमीच्या बेडकांपेक्षा या बेडकांचा आवाज आणि रंग जरा वेगळा असतो.

वसईच्या नवाळे गावात विशाल वर्तक यांच्या शेतात हे पिवळे बेडूक दिसून आले. तर बुलढाणा येथील गजानन पार्क घाटपुरी नाक्याजवळ पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डबक्यात देखील हे पिवळ्या रंगाचे बेडके आढळली होती…

दरम्यान, हे बेडूक Indian Bullfrogs या वैज्ञानिक नावाने ओळखले जातात, यांचा आकार मोठा असतो मात्र यांचा धोका नसतो. हे विषारी बेडूक नसतात. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका या देशात या प्रजाती आढळून येतात. पिवळा हा त्यांचा खरा रंग नसतो मुळात हे बेडूक ऑलिव्ह ग्रीन रंगाचे असतात मात्र प्रजनन प्रक्रिया करण्याआधी ते रंग बदलून पिवळे होतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button