breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

वंचित बहूजन आघाडी ‘बॅकफूट’वर, पिंपरीत प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी नियोजनाचा अभाव

कार्यकर्त्यांमध्ये मतभेद, उमेदवारीवरुन नाराजी नाट्य, निष्ठावंतावर अन्यायाची भावना

पिंपरी महाईन्यूज

मावळ लोकसभा निवडणूकीत वंचित बहूजन आघाडीचा फॅक्टर जोरदार चालला. विशेषता पिंपरी विधानसभेसह चिंचवड, मावळातून चांगले मताधिक्य मिळवता आहे. परंतू, हाच फॅक्टर विधानसभा निवडणूक चालताना दिसत नाही. कारण, पिंपरी विधानसभा मतदारसंघात वंचित पक्षातील इच्छुक असणार्‍यांनी केलेले बंड, योग्य नियोजनाचा अभाव आणि अपुरी मनुष्यबळ यंत्रणेमुळे या मतदारसंघात वंचितची पिछेहाट होताना दिसत आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात वंचितचे कार्यकर्ते अद्यापही संभ्रमावस्थेत दिसत आहेत. मतदान अवघे पाच दिवस राहूनही म्हणावा तितका प्रभाव दिसत नाही. भारिपबरोबर वंचित आघाडीशी जोडलेल्या पक्षाचे सर्वत्र कार्यकर्त्यांत फाटाफूट झाल्याचे दिसत आहे. पक्षातील उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार करण्यास कार्यकर्त्यांचा नकार घंटा चालू आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराचा फॅक्टर दिसेनासा झाला आहे. अन्य पिंपरीत उमेदवारांची संख्या अधिक आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये टक्‍कर आहे. मात्र खरे पाहता या मतदारसंघात खरी लढत ही शिवसेना व राष्ट्रवादीच्याच उमेदवारांमध्ये दिसत आहे.

वंचितचे उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांच्याविषयी अनेकांनी नाराजी दिसत आहे. मतदारसंघात जनसंर्पकाचा अभाव, जनतेच्या प्रश्नावर कधीही आंदोलने नाहीत, सामाजिक प्रश्‍नांवर कामेही दिसत नाहीत. अशा उमेदवाराला संधी का दिली, असा सवाल वंचितमधील नाराज गटातून उपस्थित होत आहे. पक्ष वाढीसाठी प्रामाणिक काम करणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याने नाराजी उफाळून आली आहे. यामुळे उघड बंड न करता त्यांच्या विरोधातच दंड थोपटले आहे. बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रचारातील यंत्रणेत नियोजन दिसत नाही. बाळासाहेब गायकवाड यांची कार्यकर्त्यांबाबत असणारी अनास्था पाहता पिंपरी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी बॅकफुटला गेल्याचे चित्र दिसत आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या सभेचा उत्साहच नाही
आज बुधवारी (दि. 16) अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा पिंपरीत होणार आहे. त्या बाबतची माहिती कार्यकर्त्यांसह सर्वांना कळविणे गरजेचे होते. मात्र गायकवाड यांच्यासह त्यांच्यासोबतच्या कोणीही ही तसदी घेतली नाही. त्यामुळे अनेकांना या सभेविषयी माहितीच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकसभेला सत्‍ताधार्‍यांविरोधात रान उठविणार्‍या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पिंपरीतील सभेबाबत उत्साहच नसल्याचे चित्र कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button