breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोणावळा येथील ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल ‘नेस्तनाबूत’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा लोणावळा येथील ऐतिहासिक अमृतांजन पूल आज पाडण्यात आला. पुलाच्या चारही खांबांना ब्लास्टिंग करुन रविवारी (दि. 5) सायंकाळी सहाच्या सुमारास स्फोट करुन हा पुल पाडण्यात आला.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा पूल पाडण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. काल पुलावरील पाईपलाईन हालविल्यानंतर आज पुलाच्या खांबांना ब्लास्टिंग करीता होल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता पुण्याकडे जाणारी सर्व वाहने अंडा पाँईट येथून जुन्या मार्गाने तर मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट येथून लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती. ब्लास्टिंगच्या वेळी दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली होती. ब्रिटिशकाळात कोकण प्रांत हा दक्षिण महाराष्ट्राला जोडण्याकरिता ह्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती.

मागील काही वर्षापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाच्या खालून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जातो, पुलामुळे मार्गावर वळण आले असून रस्ता अरुंद झाला होता. यामुळे वारंवार याठिकाणी अपघात घडत होते.त्यामुळे हा पूल वाहतुकीकरिता अडचणीचा ठरत होता. मागील तिन वर्षापासून हा पुल पाडण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, द्रुतगती मार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य होत नव्हते.

सध्या भारतात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन आहे, त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुक तुरळक असल्याने येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा पुल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज पुल पाडण्यात आला असून पुढील दोन दिवसात रस्त्यावरील मातीचे ढिग व दगड बाजुला केले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button