breaking-newsपिंपरी / चिंचवड

लोणावळा-पुणे लोकलमधून पडून दिव्यांगाचा मृत्यू

लोणावळा-पुणे लोकल मधून पडल्याने एका दिव्यांग व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १) रात्री पावणेनऊच्या सुमारास आकुर्डी ते चिंचवड दरम्यान घडली.

चिंचवड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटली नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा रंग काळा-सावळा, वय अंदाजे ५०-५५ वर्षे, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला असून जवळ कुबडी सापडली आहे. उजव्या हातावर मोरांचे चित्र गोंदलेले असून, चिंचवड रेल्वे पोलिसांनी मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात ठेवला आहे. वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलीस कॉन्स्टेबल अनिल बागुल (८३२९३८२८०३) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button