breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकसभा निवडणुक; पालिका अधिकारी-कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशनमधून सूट

  • सुमारे अडीच ते तीन कर्मचा-यांना मिळणार सवलत

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 च्या कामकाज करण्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचा-यांचे नियुक्त्या करण्यात आल्या. त्या कर्मचारी व अधिका-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन प्रणालीमधून सूट देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी सेवा लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील कलम 29 या अधिनियमानूसार निवडणूक कामकाजाकामी अधिग्रहीत करणेत येत आहे. निवडणुकीचे कामकाज हे राष्ट्रीय कामकाज असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना महापालिकेच्या बायोमेट्रीक थम्ब उपस्थितीत प्रणालीतून त्यांची सेवा निवडणुकीच्या कामकाजाकामी निवडणुक कार्यालयाकडे रुजू झालेल्या दिनांकापासून सवलत देणेत येत आहे.

तसेच यामध्ये पुणे निवडणूक शाखा, मावळ, शिरुर लोकसभा निवडणूक आणि चिंचवड, पिंपरी व भोसरी विधानसभा मतदार संघातील अधिकारी व कर्मचा-यांना सवलत मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजातून संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना कार्यमुक्त केलेल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशनव्दारे उपस्थिती नोंदविणे आणि हजेरी पत्रकावर दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button