breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकअदालतीमुळे पालिकेची तिजोरी ‘मालामाल’, 27 कोटी 72 लाख जमा

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी लोकअदालत घेण्यात आली. त्यामध्ये एकूण 10 हजार प्रकरणे निकाली काढण्यात आले असून त्याद्वारे 27 कोटी 72 लाख 28 हजार एवढी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आकुर्डी येथील महापालिकेच्या न्यायालयात शनिवारी (दि. 13) लोकअदालत घेण्यात आली. त्यामध्ये महापालिकेचा कर संकलन विभाग, पाणी पुरवठा, स्थानिक संस्था कर या विभागातील थकीत करांची रक्कम वसूल करण्यासाठी नागरिकांशी समजोता करून प्रकरणे निकाली काढण्यात आली. यासंदर्भात स्थायीने ठरावाला मंजुरी दिली होती. त्यानुसार थकबाकीदारांना आकारला जाणारा शास्ती कर आणि पाणी पट्टी देयक सवलत थकबाकी रक्कमेवर 10 टक्के माफ आणि थकबाकीवरील 10 टक्के रक्कम ही दंडाच्या रक्कमेपेक्षा जास्त असल्यास केवळ दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय झाला. जे ग्राहक थकबाकीची रक्कम 4 समान हप्प्त्यांमध्ये भरण्यास तयार आहेत, अशांना थकबाकी रक्कमेवर पाच टक्के सवलत देण्यास व थकबाकीवरील पाच टक्के रक्कम ही दंडाच्या रक्कमेपेक्षा जास्त असल्यास केवळ दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय झाला घेण्यात आला होता.

लोकअदालतीत कर संकलन विभागाची 8 हजार प्रकरणे होती. पाणी पुरवठा विभागाची 2 हजार प्रकरणे होती. एकूण 10 हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी कर संकलन विभागाचे 4 हजार 706 व पाणीपट्टीची 75 प्रकरणे अशी एकूण 4 हजार 781 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून एकूण 27 कोटी 72 लाख 28 हजार 844 एवढी थकीत रक्कम वसूल झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडल्याची माहिती स्थायी सभापती मडिगेरी यांनी सांगितली. तसेच, पुढील लोकअदालत 14 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. तरी, प्रलंबित अन्य खटले निकाली काढण्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे. तत्संबंधीत सूचना संबंधीत विभाग प्रमुखांना देण्यात याव्यात, अशी सूचना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयुक्तांना कळविली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत, दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी एस. बी. देसाई, महापालिका कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, सहकारी श्रीवास्तव तोडकर यांनी लोकअदालत यशस्वी पार पडण्यासाठी प्रयत्न केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button